लग्न असो किंवा ओटभरणी ,गृहप्रवेश , किंवा दुसरा कोनताही समारंभ आपल्याकडे उखाणा घेतल्याशिवाय कार्य संपन्न होत नसते ! त्यामुळे मी आज तुम्हाला काही लग्नसाठी सुंदर मराठी उखाणे सांगणार आहे. बरं का हे उखाणे मुलगा व मुलगी दोघे हि घेऊ शकतात !!
नवरी मुलीचे उखाणे
१. हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…………मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
२. चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, ……………..चं नाव घेते देवापुढे
३. नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, …………रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
४. कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,……….राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती
५. हिरवा शालू, हिरवं रान ……………….च नाव घेते ठेवून सर्वांचा मान
नवरा मुलाचे उखाणे
१. एका वर्षात, महिने असतात बारा………..मुळे वाढलाय, आनंद सारा!
२. ……….च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,…………ला पाहून, पडली माझी विकेट !
३. १ फुल्ल २ ग्लास …………….. माझी फर्स्ट क्लास
४. गाडीत गाडी डेक्कन क्वीन …………….आहे माझी ब्युटी क्वीन
५. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री ………………..झाली आज माझी गृहमंत्री
गमतीदार मराठी उखाणे
१. पहिल्याच भेटीत मारला सिक्सर …………. चा नाव घेतो मी तिचा मिस्टर.
२. एक ग्लास पाणी नि एक ग्लास दारू ………….. चा नाव घेताना मी कशाला लाजू.
३. चांदीचं ताट नि सोन्याचा ग्लास, ………… रावांचं नाव घेते मी त्यांची खास.
४. लाल मेहेंदी हिरवा चुडा ……….. चा नाव घेते आतातरी मला आत सोडा
५. मटणाचा केला रस्सा, बोंबील केले फ्राय ……….. भाव देत नाही किती केले ट्राय.